Satara Rain: खटावला वादळी पावसाने पुन्हा झोडपले

वडूज, कुरोली, औंध, वेटणे, दरुज, राजापूर, गुरसाळेत जोरदार सरी
Satara Rain: खटावला वादळी पावसाने पुन्हा झोडपले
Published on
Updated on

खटाव : खटाव तालुक्याच्या बहुतांश भागाला मंगळवारी मान्सूनपूर्व वादळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. वडूज, औंध, वेटणे, दरुज, कुरोली, गुरसाळेसह इतर भागात पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. तालुक्याच्या बहुतांश भागात रात्री उशीरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता तर मोबाईल नेटवर्कही ठप्प झाले होते.

दोन दिवसांपूर्वी खटाव तालुक्याच्या उत्तर भागात झालेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने येरळा नदी दुथडी भरुन वाहिली होती. मंगळवारीही सायंकाळी तालुक्याच्या बहुतांश भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सिध्देश्वर कुरोली ते भुरकवडी पट्ट्यात दीड तास तुफान पाऊस झाल्याने शेतात पाणी साठले तर शेतकऱ्यांचे बागायती पिकांचे नुकसान झाले. औंध, गुरसाळे, वेटणे, राजापूर, मोळ, वडूज, दरुज, दरजाई, भोसरे, म्हासुर्णे, चोराडे भागातही मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

उकाड्याने त्रस्त झालेल्या खटावकरांना पावसाने दिलासा दिला मात्र जोरदार वाऱ्यामुळे रात्री उशीरापर्यंत वीजपुरवठा ठप्प झाला होता. खटावसह पुसेगाव परिसरात मोबाईल नेटवर्कही बंद झाले होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. रात्री उशीरापर्यंत खटावसह तालुक्याच्या उत्तर आणि पश्चिम भागात रिमझिम पाऊस सुरु होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news