Pune Bangalore highway traffic jam: महामार्गावर पुन्हा कोंडी

आनेवाडी टोलनाका, नागठाणे, बोरगाव हद्दीत वारंवार वाहतूक विस्कळीत
Pune Bangalore highway traffic jam
Pune Bangalore highway traffic jam
Published on
Updated on

सातारा/ नागठाणे : सलग सुट्ट्यांमुळे शुक्रवारपासून महामार्गावर नागठाणे, बोरगाव, आनेवाडी टोलनाका यासह ठीकठिकाणी वाहतुकीची वारंवार कोंडी झाली. नोकरदार वर्ग रविवारी मुंबई-पुण्याकडे माघारी परतल्याने पुन्हा कोंडी झाली. या मार्गावर नागठाणे, बोरगावजवळ सुमारे 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-सातारा या लेनवरही अनेक ठिकाणी चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

महाराष्ट्र दिन व त्याला जोडून आलेला शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर गेले तीन दिवस प्रचंड ताण आला. खंबाटकी घाटासह आनेवाडी टोलनाका, नागठाणे व बोरगाव हद्दीत वारंवार वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी सुट्टीला आलेले नोकरदार व काही चाकरमानी पुन्हा परतीकडे निघाले. लोकांना वाहनांच्या रांगेत सुमारे 3 तासांपेक्षा जास्त वेळ भर उन्हात ताटकळत बसावे लागले. यामुळे चाकरमानी व लहान मुलांना त्रास सहन करावा लागला.

शेंद्रे, भरतगाव, बोरगाव, नागठाणे, अतीत, काशीळ या हद्दीत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बोरगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दिवसभर कमी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. एक किलोमीटर प्रवासासाठी एक तास लागत होता.

बोरगाव येथील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. वाहतूक वळवलेल्या ठिकाणी तर नित्याचीच कोंडी झाली. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना नेहमी त्रास सहन करायला लागत आहे. वाहतूक वळवलेल्या ठिकाणी व रस्त्यावर मोठे स्पीड ब्रेकर आहेत. यामुुळे वाहनांचा वेग अतिशय कमी होतो. प्रत्येक वीक एन्डला या लेनवर वाहतूक कोंडी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news