

कराड : कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली. 201 ग्रामपंचायतींपैकी 99 ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण पडले आहे. महिला आरक्षणामुळे गावपातळीवर राजकीय उलथापालथ झाली असून स्थानिक नेत्यांकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.
रेठरे बु.,तारूख, मसूर, बनवडी, कार्वे, हजारमाची, खोडशी, जखिणवाडी, उंब्रज, कोडोली, कालवडे, वडोली निळेश्वर, गोळेश्वर, किवळ, इंदोली या मोठ्या ग्रामपंचायतींसह 61 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. या ग्रामपंचायती तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणार्या आहेत.
61 ग्रामपंचायतीमध्ये तारूख, वहागाव, चिखली, मसूर, शिरवडे, गोडवाडी, अकाईचीवाडी, महारूगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, शेवाळेवाडी उंडाळे, बनवडी, मालखेड, कालवडे, कामथी, शेवाळेवाडी म्हासोली, वडोली निळेश्वर, पोतळे, गोळेश्वर, किवळ, जुळेवाडी, इंदोली, कार्वे, शहापूर, जिंती, पाचुंद, शितळवाडी, यादववाडी, शेळकेवाडी येवती, घोलपवाडी, खोडशी, हजारमाची, कालेटेक, बेलवडे बुद्रुक, जखिणवाडी, वस्ती साकुर्डी, काले, गोवारे, शामगाव, हणबरवाडी, पश्चिम सुपने, मुनावळे, दुशेरे, गोंदी, उत्तर कोपर्डे यादववाडी, नांदलापूर, बाबरमाची पु.डिचोली, चचेगाव, सुर्ली, रेठरे बुद्रुक, मनू, उंब्रज, हेळगाव, गणेशवाडी, बानुगडेवाडी, धावरवाडी, यशवंतनगर, खोडजाईवाडी, कोडोली, सवादे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सरपंच आरक्षण महिलांसाठी राखीव झाले असले तरी सरपंचपद घरातच कसे राहील यासाठी स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न होतील यात शंका नाही. जरी दुसरा उमेदवार असला तरी तो आपल्याच गोटातील,आपले नेतृत्व मानणारा असेल याची काळजी नेत्यांकडून घेतली जाईल. त्या अनुषंगाचे इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. गाठीभेटीही वाढल्या आहेत. या प्रवर्गात मोठी चूरस पहायला मिळणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी शिंगणवाडी, माळवाडी, आणे, चोरजवाडी, घोणशी, वाण्याचीवाडी, भोसलेवाडी, वनवासमाची स.गड, पवारवाडी, आरेवाडी, मेरवेवाडी, बेलवाडी या ग्रामपंचायती राखीव झाल्या आहेत. येथेही उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. दरम्यान अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी सुपने ग्रामपंचायत एकमेव राखीव झाली आहे. या प्रवर्गासाठी इच्छुकांची संख्या कमी आहे. तरीही मोठी ग्रामपंचायत असल्याने सरपंच पदासाठी रंगतदार लढत होईल.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी नडशी, राजमाची, कोरेगाव, शेणोली, सैदापूर, साकुर्डी, नांदगाव, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, कुसूर, मस्करवाडी, वसंतगड, चिंचणी, अंधारवाडी, लोहारवाडी, करंजोशी, सावरघर, कालगाव, किरपे, कोळेवाडी, डिचोली मुनावळे, घोगाव, संजयनगर शेरे, भुरभुशी, कोर्टी या ग्रामपंचायती राखीव झाल्या आहेत. यामध्ये सैदापूर, शेणोली, कोपर्डे हवेली, कुसूर, नांदगाव, वसंतगड, कालगाव, कोळेवाडी, घोगाव, कोर्टी आदी मोठ्या व राजकीय दृष्ट्या संवेदनशिल गावांचा समावेश आहे. मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमूड झाला आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सैदापूर, शेणोली, कोपर्डे हवेली, कुसूर, नांदगाव, वसंतगड, कालगाव, कोळेवाडी, घोगाव, कोर्टी आदी मोठ्या व राजकीय दृष्ट्या संवेदनशिल ग्रामपंचायती राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमूड झाला आहे. तर रेठरे बु.,तारूख, मसूर, बनवडी, कार्वे, हजारमाची, खोडशी, जखिणवाडी, उंब्रज, कोडोली, कालवडे, वडोली निळेश्वर, गोळेश्वर, किवळ, इंदोली या मोठ्या ग्रामपंचायतींसह 61 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांच्या इच्छेवर पाणी पडले आहे.