

सातारा : जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने मांडवे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मांडवे हे नागरिकांचा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या निमसोड (ता. खटाव) गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले होते.
जिल्हा परिषद निवडणुकीत निमसोड हा गट नागरिकांचा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होता. यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत मांडवे हे निवडून आले.
त्यांना माण प्रांताधिकार्यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले होते. या जात प्रमाणपत्रावर जिल्हा बँकेचे संचालक नंदकुमार मोरे व ओंकार भोसले यांनी मांडवे यांच्याविरोधात समितीकडे तक्रार केली होती. यावर समितीने मांडवे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांचा कुणबी (इतर मागास वर्ग) जातीचा दावा सिद्ध होत नसल्याने तो अमान्य केला. समितीने माण प्रांताधिकार्यांनी दिलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द केल.