Satara News : साताऱ्यात वेश्या व्यवसायावर छापा

नेजरसह तरुणी ताब्यात : पुणे, मुंबईतून आणल्या जात होत्या महिला
Satara Crime News
साताऱ्यात वेश्या व्यवसायावर छापाPudhari File Photo
Published on
Updated on

सातारा : साताऱ्यातील शाहूनगर परिसरात असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा शहर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मॅनेजरसह मुंबई येथील 23 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, साताऱ्यात असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे सातारा शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिनाभर या ठिकाणी गोपनीय पाळत ठेवली होती. सुरुवातीला ठोस पुरावे मिळत नसल्याने कारवाई शक्य झाली नव्हती. मात्र, दोन दिवसांपूर्वी ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत गुरुवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत संबंधित अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. हा फ्लॅट गणेश धनवडे यांच्या नावावर असून संतोष पवार हा तेथे मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. संतोष पवार हा मुंबई व पुणे येथून महिलांना बोलावून हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यानंतर संतोष पवार व मुंबई येथील 23 वर्षीय तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

स्टेटसवर ठेवले जात होते फोटो

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून मॅनेजरच्या मोबाईलवर पुणे, मुंबई व इतर ठिकाणांहून येणाऱ्या महिलांचे फोटो स्टेटसवर ठेवले जात होते. ग्राहकांनाच हे स्टेटस दिसत होते. त्यानुसार या ग्राहकांशी संपर्क साधून दर व वेळ निश्चित करून व्यवहार केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news