Satara Police: सातारा पोलिसांवर ‘सेवा पदकांचा’ पाऊस

अतिउत्‍कृष्ट, उत्‍कृष्ट मेडल : पो.नि. घोडके, दराडेंचा सन्‍मान
Satara Police
Satara Police
Published on
Updated on

सातारा : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने सातारा जिल्‍ह्यातील २६ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना अतिउत्‍कृष्ट व उत्‍कृष्ट सेवा बजावल्‍याबद्दल सेवा पदक जाहीर करत जणू पाऊसच पाडला. यामध्ये एलसीबीचे पो.नि. विश्‍वजित घोडके, कराड शहरचे पो.नि. दत्तात्रय दराडे, पो.नि. राजेंद्र शिंदे यांचा सन्‍मान होणार आहे.

सातारा जिल्‍हा पोलिस दलातील सेवा पदकांच्या मानकर्‍यांमध्ये वाठारचे स.पो.नि. सुशील भोसले, स.पो.नि. सुदर्शन काटकर, फौजदार सुशील कदम, रौफ इनामदार, सहा. फौजदारांमध्ये सावता राऊत, तानाजी माने, सतीश सुभे, राजू मुलाणी, अविनाश डेरे, तेजपाल शिंदे या पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिस कर्मचार्‍यांमध्ये श्रीनिवास देशमुख, मंजरुह मणेर, मधुकर कुंभार, रोहित तोरसकर, संदीप दौंड, अमित माने, नीलेश दयाळ, मंगल कांबळे, गणेश कापरे, प्रवीण पोळ, मधुकर भिसे, मोहन नाचण व राजकुमार ननावरे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये दीर्घकालीन व निष्कलंक उत्‍कृष्ट सेवेची दखल या पोलिस अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची घेतली गेली आहे. या पोलिसांनी उल्‍लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवा केली आहे. पोलिसांना प्रोत्‍साहन देण्याच्या उद्देशाने ही सेवा पदके दिली जात आहेत. एलसीबीचे पो.नि. विश्वजित घोडके हे २००९ सालच्या बॅचचे फौजदार आहेत. सातारा जिल्‍ह्यासह नांदेड, लातूर, सीआयडी पुणे, सोलापूर ग्रामीण येथे त्‍यांनी सेवा बजावली आहे. पंढरपूर व पुसेगाव येथे बजावलेले कर्तव्‍य प्रभावी राहिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांचा सन्‍मान केला आहे.

कराड शहरचे पो.नि. दत्तात्रय दराडे यांची कारकिर्द गाजलेली आहे. ३२ वॉन्‍टेड गुन्‍हेगारांच्या मुसक्‍या आवळल्‍या. २० खुनांच्या गुन्‍ह्यांची उकल त्‍यांनी केली आहे. १० दरोडे, २२ जबरी चोरी, १६ घरफोड्या ओपन केल्‍या आहेत. १० पिस्‍टल जप्‍त करून १७ जणांना एमपीडीए लावला आहे. याशिवाय ३ टोळ्यांचे ‘मोका’ प्रस्‍ताव तयार केले असून त्‍यांना मान्‍यता मिळाली आहे. आतापर्यंत त्‍यांना २४८ रिवॉर्ड व २०१ कॅश रिवॉर्ड मिळालेली आहेत. पोलिस महासंचालक पदकानेही त्‍यांना सन्‍मानित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news