Satara Fraud Case : पोलिस उपनिरीक्षकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara Fraud Case
पोलिस उपनिरीक्षकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हाPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : आर्थिक अडचण सांगून 12 तोळे 7 ग्रॅमचे सोन्याचे दागिने तसेच कार आणि 2 ते 3 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून वाई पोलिस ठाण्यात एका श्रेणी पोलिस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटला तरी संबंधितांवर कारवाई न झाल्याने पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे धाव घेतली आहे.

श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संपत भोसले (रा. मलकापूर, ता. कराड) व त्यांचे सहकारी अजिंक्य जाधव (रा. मसूर, ता. कराड), तुषार ताटे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सीमा सचिन जमदाडे (वय 34, रा. नारळीबाग, वाई) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे पती सचिन जमदाडे हे जिल्हा पोलिस दलामध्ये नोकरीस आहेत. पती सचिन जमदाडे यांच्यासोबत नोकरीस असलेले श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संपत भोसले यांचे आमच्या घरी येणे-जाणे असल्याने माझ्या ओळखीचे आहेत. माझा हॉटेल व्यवसाय असल्याने व्यवसायासाठी कारचा वापर करत आहे. 1 मार्च 2019 रोजी संपत भोसले व त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये आले. काही कामासाठी तुमची कार द्या, थोड्याच दिवसांत परत करतो, असे सांगून कार नेली. त्यानंतर थोड्याच दिवसांत माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, असे सांगितल्यानंतर माझ्या जवळील 12 तोळ्यांचे दागिने त्यांना दिले. कोरोना झाल्याने मला पैशाची गरज आहे. असे सांगून माझ्या पतीकडून 2 ते 3 लाख गुगल पे व रोख स्वरूपात घेतले.

वेळोवेळी मागणी करूनही पैसे, दागिने व कार परत न देता माझी फसवणूक केली. यामुळे वाई न्यायालयात संशयितांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतर वाई पोलिस ठाण्यात 2 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news