

सातारा : कोरेगाव येथे कॉल सेंटर थाटून रात्रीच्या भानगडी करत अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणात 21 जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीवर गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 35 लाख 34 हजारांची रोकड व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सागर सुर्यवंशी (वय 33, रा. गणेश गल्ली, मानखुर्द पश्चिम मुंबई) हा कॉल सेंटरचा मालक असून तोच या फसवणूक प्रकरणाचा मास्टर माईंड आहे. जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली.
याप्रकरणी सुर्यवंशी याच्यासह विरेंद्र बोडरे (27, रा. भोर्ला गोवंडी, मुंबई), अक्षय भंडारी (28, गौतमनगर, गोवंडी मुंबई), मनिष जोशी (28, रा. त्रिवेदी फला, सागवाडा, जि. डुंगरपूर), रितेश चौहाण (26 रा. नालासोपारा, पूर्व मुंबई) यांना अटक केली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख पिंगळे, अपर पोलिस प्रमुख वैशाली कडुकर, कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विश्वजीत घोडके यांनी पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार करुन ही कारवाई केली.
सागर सूर्यवंशी हा कोरेगाव ते रहिमतपूर जाणाऱ्या रस्त्यावरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर श्रीसाई लॉजिस्टीक्स ॲन्ड कन्सल्टंस हे बोगस कॉल सेंटर सुमारे फेब्रुवारी 2026 पासून चालवत होता. तेथे अमेरिकन नागरिकांना तुम्ही ॲमेझॉनवरुन एक वस्तू ऑर्डर केली आहे, त्याचे पैसे द्यावे लागतील, अशी भिती दाखवून त्यांची फसवणूक करण्यासाठी बोगस कॉल सेंटर चालवले जात असल्याचे समजले. पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवून 23 मे रोजी छापा टाकला असता तेथे 17 व्यक्ती व 4 महिला बेकायदेशीर श्रीसाई लॉजिस्टीक्स ॲन्ड कन्सल्टंस एलएलपी या नावाच्या कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन ॲपद्वारे संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणात गुरुप्रसाद राणे, (रा. उलवे, ता. पनवेल), शमशुद्दीन सफाट सय्यद, (अमृतनगर, ठाणे), गौरव लांडगे (रा. पाडळे, लोणंद, ता. खंडाळा), अभिषेक गुप्ता, (रा. नवी मुंबई), इशांत खांडेकर, (रा. मुक्तीनगर, चेंबुर, मुंबई), बाबू चलवादी, ( रा. भोर्ला गोवंडी, मुंबई), अवि वानखेडे, (रा. तुर्भे नाका, नवी मुंबई), दीपक खंडारे (रा. तुर्भे नाका, नवी मुंबई), मोहंमद शफिक सलीम कोकणे (रा. भोर्ला गोवंडी मुंबई), ओमकार घार्गे (रा. चेंबूर मुंबई), दिपेन जाधव (रा. भोर्ला गोवंडी, मुंबई), लेबीन सायमन (रा. कोळीवाडा मालाड, पश्चिम मुंबई) यांच्यासह चार महिला व अटक केलेले पाच अशा 21 जणांवर गुन्हा दाखल झाला .
पोनि विश्वजीत घोडके, पोनि अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, अतिश घाडगे, शिवाजी गुरव, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, लैलेश फडतरे, जयवंत खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, संदिप पाटील, राजू कांबळे, अरुण पाटील, स्वप्नील शिंदे, प्रविण कांबळे, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ, संकेत निकम, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, शकुंतला सणस, अधिका वीर यांनी ही कारवाई केली.