Phaltan Water Supply| फलटण शहराचा पाणीपुरवठा आज बंद

जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे आज काम
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

फलटण : फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम आज मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण फलटण नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून व काटकसरीने वापरावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवार, दि. ४ नोव्हेंबरपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. या तात्पुरत्या पाणीपुरवठा बंदीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करुन नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी जाहीर प्रकटनाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.