Satara Panchayat Samiti: पंचायत समिती इमारतीच्या कामास लवकरच गती

प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली; निविदा प्रक्रिया सुरू
Satara Panchayat Samiti: पंचायत समिती इमारतीच्या कामास लवकरच गती
Published on
Updated on

कराड : कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाच्या नव्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीसाठी तांत्रिक मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागातून देण्यात आली.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने कराड पंचायत समितीच्या स्वतंत्र आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामीण विकास विभागाच्या आदेशानुसार हा निधी मंजूर करण्यात आला असून, 3620 चौ. मी. क्षेत्रफळाच्या जागेत या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

कराड पंचायत समितीची सध्याची इमारत ही जुनी व जीर्ण झाली आहे. यामुळे कामकाजासाठी जागा अपुरी पडत आहे. याच इमारतीमध्ये बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे, बाल विकास प्रकल्प आदी विभागांची कार्यालये कार्यरत आहेत. कराड तालुका हा लोकसंख्येच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने मोठा तालुका असून, शासकीय कामांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकं येतात. पण अपुऱ्या जागेमुळे लोकांची गैरसोय होते. पंचायत समितीशी निगडित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी यावीत आणि त्या माध्यमातून नागरिकांना सर्व शासकीय सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी आ.डॉ.भोसले यांनी विशेष प्रयत्न केले होते.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे या इमारतीच्या उभारणीसाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. नुकतीच तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागातून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news