Satara News : पाडळीच्या ज्योतिर्लिंग देवस्थानास ‌‘ब‌’ वर्ग दर्जा

आ. मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश
Satara News
पाडळीच्या ज्योतिर्लिंग देवस्थानास ‌‘ब‌’ वर्ग दर्जा
Published on
Updated on

नागठाणे : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याने तीर्थक्षेत्र पाडळी ता. सातारा येथील ज्योतिर्लिंग देवस्थानास महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ‌‘ब‌’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. हा दर्जा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांची भाविकांची मागणी मान्य झाल्याने देवस्थानचा विकास होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र शासनाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ ‌‘क‌’ वर्ग चा ‌‘ब‌’ वर्ग करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला होता. सदर प्रस्तावाची ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य निकष समितीच्या बैठकीत छाननी करण्यात आली. हा प्रस्ताव शासन निर्णयातील निकषांनुसार परिपूर्ण सादर केला असल्यामुळे पाडळी देवस्थानास ब वर्ग देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार देण्यात आला. कोल्हापूर येथील ज्योतिर्लिंग यात्रेत मिरवणूक सोहळ्यात पाडळी येथील सासनकाठीला अग्रस्थान असते. तसेच या पूर्वी महाराष्ट्र शासनाचे कॉपीराईट नामांकन प्राप्त झाले आहे. वर्षभर देवस्थान ट्रस्टतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news