Satara Leopard Sighting : निगडी वंदन येथे मध्यरात्री बिबट्याचा वावर

निगडी वंदन (ता. सातारा) येथील कोंढार नावाच्या शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आले
leopard sighting
leopard sightingpudhari photo
Published on: 
Updated on: 

वेणेगाव : निगडी वंदन (ता. सातारा) येथील कोंढार नावाच्या शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आले असून, गुरुवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बिबट्या चक्क गावात दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे निगडी वंदनसह परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोंढार शिवारालगत चिंचणी पुनर्वसन गावाच्या परिसरात शेळीच्या गोठ्याजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या आल्याची माहिती पोलीस पाटील नवनाथ मांडवे यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनपाल सुनील शिंदे व वनरक्षक अभिजीत कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरात आढळून आलेल्या ठशांवरून बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. वनरक्षक अभिजीत कुंभार यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.

दरम्यान, बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या वावरामुळे निगडी वंदनसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी सरपंच संदीप मांडवे, पोलीस पाटील नवनाथ मांडवे, प्रकाश भाले, चंद्रकांत कांबळे, भैरू मांडवे, सुरज मांडवे, चैतन्य मांडवे, सचिन मांडवे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news