Satara News | घरफोड्यांनी सातारा हादरला

१७ लाखांचा ऐवज लंपास : कूपर, निसर्ग कॉलनी टार्गेट
Satara News
घरफोड्यांनी सातारा हादरलाFile Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरातील कूपर कॉलनी व निसर्ग कॉलनीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. या परिसरात दोन घरफोड्या करून चोरट्यांनी १७ तोळे सोन्यासह तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल लांबवला. या घटनांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

गौरव सुरेश शिंदे (वय २८, रा. कूपर कॉलनी, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गौरव व त्यांच्या पत्नी या कामानिमित्त परगावी होत्या. हीच बाब हेरून चोरट्यांनी त्यांचे घर लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटचा मुख्य दरवाजा व बेडरूमचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सोन्याचे व डायमंडचे दीड लाखाचे नेकलेस, ६५ हजारांचे सोने व डायमंडचे ब्रेसलेट, ७५ हजारांचे नेकले, १ लाखांची सोन्याची बांगडी, ४५ हजारांचे सोन्याचे पेंडंट, इतर सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळ आणि रोख २ लाख रूपये असा १४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. शिंदे हे घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शाहुपूरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला.

दि. २३ ते २४ सप्टेंबर या कालावधीत फ्लॅटच्या दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून घरातून चोरट्यांनी सोन्याचे गंठण, कानातील डायमंड सेट, मनगटी घड्याळ चांदीचे दागिने राख १० हजार रुपये असा २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. दरम्यान, भरवस्तीमधील इवलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरुन तपास सुरु

दुसऱ्या घरफोडी प्रकरणी बळीराम बावा सोनटक्के (वय ५२, रा. समृध्दी कॉलनी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी घरफोडी करताना बंद पलॅट टार्गेट केले आहे. चोरीवेळी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. चोरीची पध्दत, सीसीटीव्ही फुटेजमधील चोरट्यांचे वर्णन यावरुन पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news