Satara Crime : मित्राच्या खूनप्रकरणी झारखंडच्या दोघांना जन्‍मठेप

१ जून २०२० रोजी घडली होती घटना
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

सातारा : देगाव (ता.सातारा) येथे दगडाने ठेचून खून केल्‍याप्रकरणी दोघांना जिल्‍हा न्‍यायालयात जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना १ जून २०२० सालची आहे. सर्वजण परप्रांतीय मित्र असून ते कामानिमित्त सातार्‍यात वास्‍तव्‍य करत आहेत. राजू मुर्मू असे खून झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. याप्रकणी राजेश बुधान टुड्डु (वय २५, सध्या रा. संभाजीनगर सातारा), गणेश सोनाराम मुर्मू (वय ३०, दोघे मूळ रा. झारखंड राज्य) या दोघांना जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दि.१ जून २०२० रोजी सकाळी आरोपी यांनी राजू मुर्मू यांना जेवण करण्यासाठी बोलवले होते. तेथे तिघांनी दारु पिल्‍यानंतर झारखंड येथील गावाकडील सायकल चोरीच्या कारणातून वादाला सुरुवात झाली. दोन्‍ही आरोपींनी आपापसात संगनमत करुन दुचाकीवरुन देगाव येथे नेवून खून केला. दगडाने तोंडावर, डोक्यात मारुन त्यांचा खून करत मृत व्‍यक्‍तीचे ओळख न पटण्यासाठी मोबाईल व पाकीट काढून पुरावा नष्ट केला. खूनाची घटना समोर आल्‍यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला.

पोनि सजन हंकारे यांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खूनप्रकरणी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश २ एस. आर. तांबोळी यांनी जन्‍मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ॲड गौरी लकडे, वैशाली पाटील, आशीर्वाद कुलकर्णी यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news