Satara News: जिल्ह्यात थंडी वाढली; सातारकर गारठले

किमान तापमानात घट; सकाळी थंडी तर दुपारी चटका
Satara News: जिल्ह्यात थंडी वाढली; सातारकर गारठले
Published on
Updated on

सातारा : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्यात स्वारी केली असल्याने जिल्ह्यात हुडहूडी वाढली आहे. किमान तापमानात घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. थंडीमुळे सातारकर चांगलेच गारठले आहेत. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे तर पहाटे थंडीचा कडाका वाढला आहे.

दरम्यान, थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे किमान तापमान 12 अंश तर सातारचे किमान तापमान 13.5 अंश होते. अवकाळी पावसामुळे थंडीचे आगमन लांबणीवर पडले होते.मात्र दिवाळीत पडणाऱ्या थंडीने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच डोके वर काढले आहे. सातारा जिल्ह्यात किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात थंडीचा जोर वाढला आहे. दिवसभर हूडहूडी जाणवत आहे. थंडीचा जोर वाढत असल्याने स्वेटर, मफलर यासह उबदार कपड्यांना मागणी वाढू लागली आहे.

थंडीमुळे गावोगावी तसेच चौकाचौकात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. त्यामुळे या शेकोट्याभोवता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या चांगल्याच गप्पा रंगताना दिसत आहेत. मंगळवारी साताऱ्याचे किमान तापमान 13.5 अंश तर महाबळेश्वरचे किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 25.6 अंश सेल्सिअसवर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news