Satara Crime : अवैध दारू वाहतुकीवर कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचगणी पोलिसांची कारवाई
Satara Crime News
अवैध दारू वाहतुकीवर कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

पाचगणी : पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिसांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत स्कॉर्पिओ वाहनासह सुमारे 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राहुल मधुकर देशमुख (वय 34, रा. नेर, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. शाहूनगर, पाचगणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 मे रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील शाहूनगर परिसरात सेंट जेव्हीअर्स गेटजवळ पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (क्र. एमएच 14 बीवाय 0909) मधून मोठ्या प्रमाणात देशी दारुची वाहतूक सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत राहुल देशमुख याला ताब्यात घेतले. पोलिस तपासात देशमुख हा विनापरवाना दारू वाहतूक व विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत सुमारे 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तपास सपोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तानाजी शिंदे करत आहेत. दरम्यान, पर्यटनस्थळी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाई सुरू राहणार असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news