Satara News: मविआ जिल्ह्यातील सर्व नगरपालिका एकत्र लढणार

साताऱ्यातील संयुक्त बैठकीत एकमुखी निर्णय
Satara News: मविआ जिल्ह्यातील सर्व नगरपालिका एकत्र लढणार
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याचा निर्णय गुरुवारी साताऱ्यात झालेल्या आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, महाबळेश्वर, मलकापूर, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, वाई या 9 नगरपालिका व मेढा नगरपंचायतीची निवडणूक सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित लढवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सर्व निवडणुका आ. शशिकांत शिंदे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार असून सत्ताधारी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करावे, असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.

यावेळी शिवसेना उबाठाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, बाबासाहेब कदम, रजनी पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, डॉ. नितीन सावंत, राजाभाऊ निकम, पारिजात दळवी, गोरख नलवडे, किसनशेठ भिलारे, साहिल शिंदे, विजय बोबडे, संतोष शिंदे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, हणमंत चवरे, यशवंत घाडगे, बाळासाहेब शिंदे, सुमित नाईक, गणेश अहिवळे, प्रणव सावंत, मनसेचे राहुल पवार, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, कॉ. विजय निकम, कॉ. शंकर पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सातारच्या नगराध्यक्षपदासह सर्व 50 जागा लढवण्याचा निर्धार

महाविकास आघाडीच्या बैठकीत जिल्ह्यातील 9 नगरपालिका व एका नगरपंचायतीमधील निवडणुकीबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी सातारा नगरपालिका निवडणुकीवरही चर्चा झाली. सातारच्या नगराध्यक्ष पदासह सर्व 50 जागा एकसंधपणे लढवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला. निवडणुकीत ताकदीने लढा देण्याचे आवाहन नेत्यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news