Satara News : भोळेवाडी येथे वीज पडून पती ठार; पत्नी जखमी, शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला

Satara News : भोळेवाडी येथे वीज पडून पती ठार; पत्नी जखमी, शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला
Published on
Updated on

उंब्रज : भोळेवाडी (ता. कराड) येथे शेतात काम करणारे 51 वर्षीय शेतकरी सतीश नाथा सूर्यवंशी हे अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाले. त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतीश सूर्यवंशी, त्यांची पत्नी उषा व भावजय हे माळ नावचे शिवारातील शेतात भांगलण करण्यासाठी गेले होते. दुपारी 2.45च्या सुमारास अवकाळी पाऊस व विजेचा कडकडाट होताच सतीश व त्यांची पत्नी उषा हे लिंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी आले. सतीश झाडाला टेकून उभे होते. काही अंतरावर पत्नी उषा झाडाखाली बसली होती. भावजय दुसऱ्या झाडाखाली बसली होती.

दरम्यान पावसाबरोबरच विजेचा कडकडाट होऊन नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली. यात सतीश सूर्यवंशी जागीच ठार झाले तर पत्नी विजेच्या धक्याने किरकोळ जखमी झाल्या. घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी कराड पोलिस तसेच तहसीलदार यांना दिली. सतीश सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news