Koyna Dam : कोयना धरणात चोवीस तासांत सात टीएमसी पाणी

मुसळधार पावसामुळे ८६,३११ क्युसेक पाण्याची आवक
Koyna Dam |
Koyna Dam | Pudhari Photo
Published on
Updated on

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे. धरणांतर्गत विभागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे ओसंडून वाहत असून यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढले आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी ८६,३११ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, सोमवार संध्याकाळी पाच ते मंगळवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ७.४५ टीएमसीने तर पाणीउंचीत १३.२ फुटांनी वाढ झाली आहे.

सध्या कोयना धरणात उपलब्ध ३८.१२ टीएमसी तर उपयुक्त ३३ टीएमसी पाणीसाठा आहे. सोमवार संध्याकाळी पाच ते मंगळवार संध्याकाळी पाच या चोवीस तासांत कोयना २६४ मिलिमीटर, नवजा २७२ मिलिमीटर, महाबळेश्वर ३८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान धरणातील पाणीसाठ्यात ७.४५ टीएमसीने वाढ झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या उपलब्ध ३८.१२ टीएमसी पाणीसाठा असून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून तब्बल ६७.१३ टीएमसी पाण्याची गरज आहे. या पावसात मोठ्या प्रमाणावर वादळी वारे वाहत असल्याने पाटण तालुक्यातील अनेक गावात घरांची पडझड, घरावरची छतं, पत्रे उडून जाणे, घरांसह स्थानिक रस्ते महामार्ग खचणे, स्थानिक घरं, रस्ते,महामार्गावर झाडे,वीजेचे खांब, तारा पडणे असे गंभीर व धोकादायक प्रकार मागील तीन दिवसांपासून सातत्याने घडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news