Satara News: दहिवडी येथील अवैध लाकडाचा साठा जप्त

दहिवडी येथील राणंद रोड परिसरात असलेला अवैध लाकडाच्या साठ्यावर कारवाई करुन वनविभागाने सुमारे 6 घनमीटर अवैध रायवळ लाकूड जप्त केले.
Satara News: दहिवडी येथील अवैध लाकडाचा साठा जप्त
File Photo
Published on
Updated on

दहिवडी : दहिवडी येथील राणंद रोड परिसरात असलेला अवैध लाकडाच्या साठ्यावर कारवाई करुन वनविभागाने सुमारे 6 घनमीटर अवैध रायवळ लाकूड जप्त केले. याप्रकरणी वनरक्षक दहिवडी यांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

रविराज टिंबर मर्चंटचे मालक रविराज सुर्यकांत खामकर (रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) यांनी मिश्र जातीचा रायवळ लाकूड (4.80 घ.मी.) अवैधरित्या साठवून ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच दुसरा सकुंडे टिंबर मर्चंटचे मालक मयुर पोपट सकुंडे (रा. दहिवडी) यांनी 1.20 घ.मी. रायवळ लाकूड अवैधरित्या वाहतूक करून साठवले होते. या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान, अवैध लाकूड वाहतूक, साठा, वृक्षतोड, राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण, वन्यप्राण्यांची शिकार, अथवा वनवणवा लावणे हे गंभीर गुन्हे असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वनक्षेत्रपाल अमित मुळीक, वनपाल मंगेश साळुंखे, वनपाल हणमंत बालटे, वनरक्षक राहुल रणदिवे व वनरक्षक हरिष शिंदे यांनी सहभाग घेतला. तपास वनपाल मंगेश साळुंखे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news