Satara News : शिवतीर्थ परिसरात बेकायदा होर्डिंग्ज

सुशांत मोरे यांचा रस्त्यात ठिय्या : पालिका प्रशासनावर टीका
Satara News
शिवतीर्थ विद्रुपीकरणाविरोधात सामाजिक सुशांत मोरे यांनी रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलन केले.
Published on
Updated on

सातारा : शिवतीर्थ परिसरात भर पावसात फ्लेक्स स्ट्रक्चर उभारण्याच्या कामाला सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी विरोध केला. भर पावसात रस्त्यावरच ठिय्या मारत आंदोलन केले. यावेळी त्यांनी सातारा पालिका प्रशासन तसेच पदाधिकार्‍यांवर टीका केली.

पालिकेने शिवतीर्थ परिसरात नो फ्लेक्स झोन जाहीर केला आहे. मात्र, तरीही या परिसरात फ्लेक्स लावण्याचा सांगाडा उभारण्याचे काम सुरू केले. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या प्रकाराला विरोध केला. मात्र, संबंधित ठेकेदाराने रेटून फ्लेक्सचा सांगाडा उभारण्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे सामाजिक कार्यकते सुशांत मोरे यांनी पोवई नाक्यावर सातारा-कोरेगाव रोडवर भर पावसात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांनी सुशांत मोरे यांची मनधरणी केली. संबंधित सांगाडा हटवण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका सुशांत मोरे यांनी घेतली.

संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत घालण्याचे आश्‍वासन देत संबंधित फ्लेक्स सांगाडा हटवण्यात आला. त्यानंतर सुशांत मोरे यांनी आंदोलन मागे घेतले. ते म्हणाले, शिवतीर्थ परिसराचे विद्रुपीकरण अजिबात खपवून घेणार नाही. नो फ्लेक्स झोनमध्ये फ्लेक्स लावले जात असताना प्रशासन कारवाई का करत नाही. एसीमध्ये बसणार्‍या पालिका पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. शिवतीर्थाचे पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक शंकर माळवदे, नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news