Satara News : आठ दिवसांत मुसळधार; नंतर पावसाची दडी

जुलैचा पंधरवडा आणि ऑगस्ट महिन्यातील पावसावर सिंचन व वीजनिर्मितीचे भवितव्य
Koyna Dam
Koyna DamFile Photo
Published on
Updated on

गणेशचंद्र पिसाळ

पाटण : जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोयना विभागात सरासरी १५०० मिलिमीटर पाऊस व धरणात ३० टीएमसी पाण्याची आवक झाली. परंतु दुसरा आठवडा कोरडा गेल्याने धरणात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. सध्या धरणात ५३.६१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जुलैचा दुसरा आठवडा पूर्णपणे कोरडा गेल्याने धरणावर अवलंबून आगामी जलविद्युत निर्मिती व सिंचनाची स्थिती अद्यापही म्हणावाशी समाधानकारक नाही.

आतापर्यंत धरणांतर्गत विभागात सरासरी १८०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी मिलिमीटर ३०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. धरणात सध्या उपलब्ध ५३.६१ टीएमसी यापैकी उपयुक्त ४८.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी १५ जुलैअखेर धरणात ६०.०५ टीएमसी पाण्याची आवक झाली होती याउलट यावर्षी आत्तापर्यंत ४०.९० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

आतापर्यंत सिंचन तथा पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी एक जून पासून १.३१ टीएमसी तर पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी १.४५ टीएमसी इतकाच पाणीवापर झाला आहे. या जलवर्षात बहुतांश काळ पश्चिमेकडील वीजनिर्मिती बंदच ठेवण्यात आली असून आता तुरळक प्रमाणात वीजनिर्मिती केली जात आहे. येणाऱ्या काळात येथे अपेक्षित पाऊस व त्याचपटीत पाण्याची आवक अत्यंत गरजेची बनली असून मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news