Satara News | कोसळणारी वीज पोलिस ठाण्याकडून 'कैद'

कराडमध्ये दुर्घटना टळली : आपत्कालीन उपाययोजना आली कामी
satara news
कराड डीवायएसपी व कराड तालुका पोलिस ठाण्याची इमारत व त्यावरील गोल केलेले लाईटनिंग अरेस्टर.pudhari
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यात मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस सुरु असताना कराड डीवायएसपी कार्यालय, कराड तालुका पोलिस ठाण्याच्या परिसरात पडणारी वीज या इमारतीवरील वीज विद्युत रोहकाने (लाईटनिंग अरेस्टर) खेचून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस ठाण्यावर पडणारी वीज जणू 'अरेस्ट' (अटक) झाल्याचे चित्र निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांची वायरलेस यंत्रणा ठप्प झाल्यानंतर अथक प्रयत्नांच्या शर्थीनंतर ती मध्यरात्री पूर्ववत झाली.

कराड शहरात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जोरदार पाऊस पडत होता. विजांचाही अक्षरशः तांडव सुरु होता. अशातच कराड डीवायएसपी कार्यालय व कराड तालुका पोलिस ठाण्याच्या दिशेने बीज खाली येत होती. या परिसरात रुग्णालय, कराड प्रांत कार्यालय असून तेथे वीज विद्युत रोहक बसवलेले आहेत. कराड तालुका पोलिस ठाण्याच्या परिसरात पडणारी बीज क्षणात या इमारतीच्या टेरेसवरील लाईटनिंग अरेस्टरने ती ओढून घेतली. या घटनेवेळी क्षणात परिसरातील लाईट गेली. प्रचंड आवाज झाल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचारी घाबरुन गेले.

वीज, लाईटच्या तडाख्याने पोलिस ठाण्यातील वायरलेस यंत्रणा ठप्प झाली. मोठा अनर्थ टळला असल्याचे पोलिसांच्या क्षणात लक्षात आले. यानंतर फोनाफोनी सुरु ठेवून बाहेर पाहणी केली असता पडणारी वीज विद्युत रोहक यंत्राने ओढून घेतल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. काळ आला होता पण बेहत्तर ठरल्याची प्रचिती पोलिसांना आली.

वीज पडताना १५ पोलिस होते

कराडमध्ये मंगळवारी सुमारे ३ कोटी रुपयांच्या रकमेवर दरोडा पडला होता. यामुळे कराड पोलिस, एलसीबी पोलिस कराडात तळ ठोकून होते. चोरटे कोण? आरोपी कुठे गेले? तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज तपासणे आदी कामे पोलिस ठाण्यांमध्येच सुरु होती. सुमारे १५ हुन पोलिसांचा फौजफाटा वीज पडताना तेथे होता. वीज डीवायएसपी व कराड तालुका पोलिस ठाणे असलेल्या एकत्रित इमारतीवर पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

वायरलेस यंत्रणा व्हिडीओ कॉलमुळे सुरू

कराड डीवायएसपी, कराड तालुका पोलिस व वायरलेसचा केडीव्हीएस विभाग एकाच इमारतीमध्ये असून लागूनच प्रांत तसेच तहसील कार्यालय आहे. याशिवाय परिसरात रहिवासी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. विजेच्या दणक्याने पोलिसांची वायरलेस यंत्रणा गुडूप झाल्यानंतर वायरलेसचे सातारा येथील पोलिस निरीक्षक अनंत कदम यांनी व्हिडीओ कॉलवरुन तेथील पोलिसांना वायरलेस सुरु करुन देण्यासाठी अथक प्रयत्न केले. चार तासानंतर कराड वायरलेस यंत्रणा सुरळीत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news