Satara News: भाजपचा उमेदवार कोण? साताऱ्यात उत्सुकता

भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीचे अधिकार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिले आहेत
Satara News: भाजपचा उमेदवार कोण? साताऱ्यात उत्सुकता
Pudhari File Photo
Published on
Updated on

सातारा : भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीचे अधिकार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिले असल्याने साताऱ्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण? याविषयी जोरदार सस्पेन्स आहे. खा. उदयनराजे गटाला नगराध्यक्ष पद दिले तर काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे की आणखी कोण? याविषयी अटकळी सुरू असतानाच अधिकार आपल्याकडे असतील तर अध्यक्षपदही आपल्याकडे ठेवा, असा आग्रह शिवेंद्रराजे गटाने धरल्याने अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण की आणखी कुणी? याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत.

सातारा नगराध्यक्षपदाचे सर्व अधिकार शिवेंद्रराजे भोसले यांनी स्थानिकांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठींना निर्णय दिला जाईल, असे सांगितले आहे. खा. उदयनराजे गटाला नगराध्यक्षपद दिले जाईल अशी चर्चा असली तरी अद्याप उदयनराजे व शिवेंद्रराजेंची अधिकृत चर्चा झालेली नाही. दोघांमध्ये चर्चा घडवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्यापही दोघे अधिकृत चर्चेला बसलेले नाहीत.

मात्र, उदयनराजे गटाकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे ही नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी उदयनराजे नेहमीप्रमाणे धक्कातंत्रही वापरू शकतात. त्याचवेळी निर्णयाचे अधिकार जर आलल्याकडे असतील तर व मागची पाच वर्षे नगराध्यक्षपद त्यांच्याकडे होते त्यामुळे नगराध्यक्षपदाबाबत तडजोड करू नये, असा आग्रह शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण ही नावे चर्चेत असली तरी ऐनवेळी शिवेंद्रराजेंही धक्कातंत्र वापरू शकतात. एक मात्र निश्चित भाजपचा नगराध्यक्ष करायचा असल्याने दोन्ही राजेंना चालणाराच उमेदवार द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूने आ. शशिकांत शिंदे यांनी ताकद लावल्याने व क्लिन आणि नवा चेहरा देण्याचे ठरवल्याने दोन्ही राजेंना उमेदवार देताना स्वच्छ प्रतिमेचा नवा चेहरा द्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news