Newlywed death: प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा साताऱ्यात 12 व्या दिवशीच मृत्यू

घातपात केल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा आरोप
Ended life
Ended lifePudhari Photo
Published on
Updated on

सातारा : अवघ्या 12 दिवसांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली. मुलीचा तिच्या सासरच्यांनी घातपात केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर सिव्हिलमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

भाग्यश्री संजय मोटे (वय 21, मूळ रा. पांढरेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली सध्या रा. विकासनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, भाग्यश्री दि. 30 मार्च रोजी बेपत्ता झाली होती. या घटनेनंतर त्याचदिवशी राजकुमार लालासो कांबळे (25, मूळ रा. पुळकोटी, ता. माण, जि. सातारा सध्या रा. विकासनगर, सातारा) याच्या मोबाईल नंबरवरून मोटे कुटुंबीयांना काही फोटो आले. त्या फोटोमध्ये भाग्यश्री व राजकुमार कांबळे यांचा विवाह झाल्याचे दिसून आले.

यानंतर राजकुमार कांबळे व मोटे कुटुंबीयांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये कांबळे कुटुंबीयांनी मोटे कुटुंबीयांकडे 5 लाख व 5 तोळे सोने मागितले. मात्र, मोटे कुटुंबीयांनी हुंडा देण्यास नकार दिला. भाग्यश्री व राजकुमार दोघे विकासनगर, सातारा येथे राहत होते. दि. 12 एप्रिल रोजी राजकुमार याने मोटे कुटुंबीयांना फोन करून ‌‘तुमची मुलगी भाग्यश्री हिला सातारा सिव्हिलमध्ये ॲडमिट केले आहे. तुम्ही लवकर या‌’, असे सांगितले. मोटे कुटुंबीय साताऱ्यात आल्यानंतर मुलगी भाग्यश्रीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने ते हादरून गेले. हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news