Satara municipal services: कचरा विल्हेवाटीसाठी नव्या ठेकेदाराचा शोध

सोनगाव डेपोवरील कचऱ्याचा प्रश्न बिकट : पालिका सभेत होणार चर्चा
Satara municipality
Satara municipalityPudhari
Published on
Updated on

सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोवरील कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी व दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लागवण्यासाठी नव्या ठेकेदाराचा शोध सुरू आहे. जी. डी. बायोगॅस या कंपनीने नगरपालिकेवर कोणताही आर्थिक बोजा न टाकणारा 30 कोटींचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. हे काम एजन्सीला द्यायचे की नगरपालिका स्वत: करणार यावर दि. 7 एप्रिलला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. सभेसमोर विविध 42 विषय चर्चेसाठी घेण्यात आले आहेत.

साताऱ्यातील पालिका मालकीच्या खुल्या जागांवर बेकायदेशीरपणे लावल्या जाणाऱ्या होर्डिंग्जविरोधात निर्णय सभेत घेण्यात येणार आहे. वाढत्या अतिक्रमणांवरही पालिकेकडे तक्ररी आल्या आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. कचरा संकलन, रस्ते, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहांची साफसफाईसाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवर निर्णय घेण्यात येणार आहे. जकातवाडी फिल्ट्रेशन प्लांट, पंप हाऊस व उपळी केटीवेअर, शहापूर हाऊस येथे सेवा पुरवणे व देखभाल दुरूस्ती कामास मुदतवाढ व यावर्षीची वार्षिक निविदा प्रसिद्ध करण्यावर आलेल्या अहवाल चर्चा करणे, साफसफाई करणारे कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या चौगुले कन्स्ट्रक्शन तर्फे चैतन्य चौगुले यांना काळ्या यादीत टाकणे, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबाबत काढलेल्या टेंडर दरावर निर्णय घेणे, गेंडामाळ हुतात्मा उद्यान विकासाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

सध्या चर्चेत असलेल्या सोनगाव कचरा डेपोसंबंधीही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहे. या कचरा डेपोच्या पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात येणार आहे. तसेच येथील घनकचरा प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनची दुरूस्ती केली जाणार आहे. सोनगाव कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावणे आव्हान बनले असून पालिका नव्या ठेकेदाराच्या शोधात आहे. सध्या जी. डी. बायोगॅस या ठेकेदार एजन्सीने पालिकेसमोर प्रस्ताव ठेवला आहे. कोणताही खर्च न करता या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन या एजन्सीकडून देण्यात आल्याचे समजते. ही एजन्सी कचरा डेपोवर 30 कोटींचा प्रकल्प उभा करणार आहे. सध्याचा साठलेला कचरा व दररोज घंटागाड्यांद्वारे येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही एजन्सी घेणार असल्याचे सांगितले जात आहे. कचरा विल्हेवाट लाववण्याचे काम स्वत: पालिकेने करायचे की अशा एखाद्या एजन्सीला द्यायचे, यावरही विस्ताराचे चर्चा सर्वसाधारण सभेत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news