Satara Politics : साताऱ्याच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे की ॲड. डी. जी. बनकर?

उपनगराध्यक्ष निवडीसाठी गुरूवारी सर्वसाधारण सभा
Satara Politics
साताऱ्याच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे की ॲड. डी. जी. बनकर?
Published on
Updated on

सातारा : सातारा पालिकेत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी गुरूवारी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यपद हे खा. उदयनराजे गटाकडे देण्यात आले आहे. या गटाकडून माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे की ॲड. डी. जी. बनकर यांना संधी दिली जाणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वीकृत नगरसेवकदासाठी खा. उदयनराजे गट तसेच ना. शिवेंद्रराजे गटामध्ये अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.

सातारा पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी उपनगराध्यक्ष तसेच सभापती पदाच्या निवडी वेळेत होणे आवश्यक आहे. या निवडीसाठी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली असून या सभेत उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक तसेच प्रतोद व गटनेता निवडला जाणार आहे. संधी मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. खा. उदयनराजे गटाकडून उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार असल्याने माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व ॲड. डी. जी. बनकर यांच्या नावांची चर्चा आहे. दोघांनाही या पदावर काम करण्याचा अनुभव आहे. गटनेता तसेच प्रतोद पदासाठी दोन्ही गटांकडून चर्चा सुरू आहेत. या दोन्ही पदांसाठी नगरसेवक अविनाश कदम तसेच नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर यांच्या नावाची चर्चा आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी बरेच इच्छुक आहेत. त्यामध्ये खा. उदयनराजे गटाकडून शिवानी कळसकर, संजय पाटील, पंकज चव्हाण, शंकर माळवदे, भाजपकडून रीना भणगे व सुनेशा शहा तर ना. शिवेंद्रराजे गटाकडून जयेंद्र चव्हाण, कण्हैयालाल राजपुरोहित, रेणू येळगावकर, हर्षल चिकणे आदिंची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, यापूर्वी उपनगराध्यक्ष हे शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती होते. यावेळी बदल करण्यात येणार आहे.

समितींमधील सदस्यसंख्या वाढवणार

याच सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे. विषय समित्यांवर यापूर्वी 11 सदस्य असायचे. सातारा पालिकेत सर्व नगरसेवक संख्या 50 आहे. प्रत्येकाला समितीत काम करण्याची संधी मिळावी यासाठी समिती सदस्यसंख्या यावेळी वाढवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news