Satara Fraud Case: म्‍युल बँक खाते फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्‍हा

म्‍युल बँक खात्‍याच्या आधारे ३ लाख ८८ हजार रुपये घेऊन फसवणूक
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

सातारा : म्‍युल बँक खात्‍याच्या आधारे ३ लाख ८८ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्‍याप्रकरणी दोघांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला. महिला पोलिसाची गचुंडी धरून संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्‍न केला.

श्रीकांत राजाराम मतकर (वय ३४, रा. तांदुळवाडी ता. कोरेगाव) व सलमान मुनीर शेख (३०, रा. कोरेगाव) या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला. याप्रकरणी महिला पोलिसाने तक्रार दिली. ही घटना मार्च २०२६ ते सप्‍टेबर २०२६ या कालावधीत घडली. संशयितांनी स्‍वत:च्या बँक खात्‍यांमध्ये भारतातील विविध नागरिकांची सायबर पद्धतीने फसवणूक केली आहे. त्‍यांच्या बँक खात्‍यावर अनेकांची रक्‍कम आली. त्‍यानंतर आलेली रक्‍कम संशयितांनी विविध बँक खाती, यूपीआय व्‍यवहार, रोख पैसे काढून ते इतर आर्थिक माध्यमांद्वारे पुढे वळवली.

या प्रकारामुळे फसवणुकीच्या रकमेचा मूळ स्‍त्रोत लपवला आहे. संबंधित त्‍यांची बँक खाती कोणत्‍या कारणासाठी वापरली जात आहेत, याची माहिती सायबर पोलिसांनी काढली. त्‍यानुसार पोलिसांनी दोन्‍ही संशयितांना ताब्यात घेतले. यावरून चिडून संशयितांनी ‘तू मला ओळखत नाहीस. तुला दाखवतो मी कोण आहे. तुझे कुटुंब ठेवणार नाही,’ असे म्‍हणत संशयितांनी धमकी दिली. तसेच, महिला पोलिसाची गचुंडी धरत शासकीय कामात अडथळा आणत पळून जाण्याचा प्रयत्‍न केला. या घटनेमुळे ­­गोंधळ उडाला. मात्र, नागरिकांच्या मदतीने संशयितांना पोलिसांनी पकडले.

सलमान शेखवर दुसरा गुन्‍हा

यातील संशयित सलमान शेखवर हा दुसरा गुन्‍हा दाखल झाला. म्‍युल खात्‍याद्वारे जिल्‍ह्यातील अनेकांचा बँक खात्‍यांचा सर्रास वापर होत आहे. तसेच, बँक खाती भाड्याने वापरण्यासाठी दिली जात आहेत. गेल्‍या पंधरा दिवसांतील हा दुसरा गुन्‍हा दाखल झाला आहे. मतकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news