Satara Theft Case | विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; म्हसवड पोलिसांची कारवाई

दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
Satara Theft Case | विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; म्हसवड पोलिसांची कारवाई
Published on
Updated on

म्हसवड : म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतातील विहिरींमधून मोटारी चोरीला जाण्याच्या घटनांचा तपास करताना म्हसवड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत तीन चोरीच्या मोटारी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अखिल विलास जाधव (रा. मानेवाडी-कुंकुडवाड, ता. माण), आदित्य तानाजी पुकळे (रा. पुकळेवाडी, ता. माण) आणि वैभव विकास कोळी (रा. पुनर्वसन कॉलनी, मायणी, ता. खटाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंकुडवाड, ता. माण, जि. सातारा येथील रविंद्र जालिंद्र कुंभार यांच्या चव्हाण नावाच्या शिवारातील सार्वजनिक विहिरीतून सम्राट कंपनीची पाणबुडी मोटार चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता संशयितांनी मोटार चोरी केल्याची कबुली दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली पाणबुडी मोटार तसेच अन्य दोन चोरीच्या मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान आणखी दोन गुन्हे उघडकीस आले असून, संशयितांकडून एकूण १४८००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, पोलिस उपनिरीक्षक अमित शिंदे तसेच अंमलदार देवानंद खाडे, प्रकाश इंदलकर सुरेश हांगे, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव व संतोष काळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news