Satara Cyber Fraud: मोबाईल हॅक करून साडेसात लाखांना गंडा

बनवडी येथील एकास मोबाईलवर आरटीओ चलनाच्या नावाखाली आलेली बनावट एपीके फाईल डाऊनलोड करणे महागात पडले
Cyber fraud
Cyber fraud File Photo.
Published on
Updated on

पिंपोडे बुद्रुक : बनवडी येथील एकास मोबाईलवर आरटीओ चलनाच्या नावाखाली आलेली बनावट एपीके फाईल डाऊनलोड करणे महागात पडले आहे. सायबर चोरट्याने संबंधिताच्‍या एचडीएफसी बँक खात्यातून ७ लाख ६३ हजार ६०० रुपयांच्‍या रकमेवर डल्‍ला मारला. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल केला.

सर्जेराव व्यंकट नलगे (वय ६८) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नलगे हे बनवडी येथील घरी असताना त्यांच्या व्हॉटस्ॲ‌पवर एका मोबाईल क्रमांकावरून आरटीओ चलन अशी एक एपीके फाईल पाठवली. नलगे यांनी ही फाईल ओपन केली. परंतु, फाईल उघडताच त्यांच्या मोबाईलची स्क्रीन अचानक ब्लॅक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नलगे यांना बँकेतून फोन आला.

यावेळी बँकेच्या प्रतिनिधींनी त्‍यांना बँक खात्यातून १ लाख ९६ हजार दोनशे रुपयांचे व्यवहार तीनवेळा, एक लाखांचा व्यवहार एकवेळा आणि ७५ हजारांचा व्यवहार एकवेळा असे एकूण ७ लाख ६३ हजार ६०० रु. काढले आहेत का? हा फोन आल्यानंतर नलगे यांना धक्‍काच बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news