Satara MLC Election: आघाडीकडून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील चर्चेत

सातारा-सांगलीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला
शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील
शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटीलPudhari
Published on
Updated on

सातारा : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील 17 जागांच्या वाटपासाठी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघ महाविकास आघाडीमधील चर्चेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा पक्षातून सुरू आहे.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काँग्रेस 8 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ठाणे, सातारा-सांगली आणि पुणे या तीन जागा आल्या आहेत. साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. मागील निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांचा पराभव करून विजयी झाले होते. आता जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेली आहे. सांगली जिल्ह्यातून या मतदारसंघातून कोण इच्छुक असणार यासंदर्भातील नावे अद्याप समोर आलेले नाही.

महायुतीकडे सातारा-सांगलीत मिळून 630, महाविकास आघाडीकडे 193 आणि अपक्ष 30 अशी मतदारसंख्या आहे. प्रत्यक्षात काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढवल्या होत्या. त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीवरच भाजपचा या मतदारसंघातील विजय अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news