Satara News : साताऱ्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह नागोठणेत आढळला

मृत्यूचं कारण अस्पष्ट
Satara News
साताऱ्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह नागोठणेत आढळला
Published on
Updated on

नागोठणे : नागोठणे येथून शुक्रवारपासून (दि. २१ ऑगस्ट) बेपत्ता झालेल्या रविराज माणिक साळुंखे (वय २७, मूळ रा. सातारा, सध्या रा. नागोठणे) या तरुणाचा मृतदेह शनिवारी बाळसई गावाच्या हद्दीत अंबा नदीपात्रात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविराजच्या मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

रविराज साळुंखे हा नागोठणेजवळील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होता. शुक्रवारी तो नागोठणे येथील घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी नागोठणे पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर बेपत्ता अशी नोंद केली होती. त्यानंतर नागोठणे पोलिसांनी रविराजचा शोध सुरू केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news