Satara sexual assault case: चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप

अवघ्या 4 वर्षीय बालिकेचे अपहरण करून सोनगाव येथे निर्जनस्थळी तिच्यावर अमानुष अत्याचार झालेल्या घटनेत मुलीला न्याय मिळाला
Life Imprisonment
Life ImprisonmentPudhari
Published on
Updated on

सातारा : भल्या पहाटे दुचाकीवरून येऊन फिरस्ती असलेल्या अवघ्या 4 वर्षीय बालिकेचे अपहरण करून सोनगाव येथे निर्जनस्थळी तिच्यावर अमानुष अत्याचार झालेल्या घटनेत मुलीला न्याय मिळाला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर घडलेल्या या घटनेतील आरोपी संकेत स्वरूप गुजर (वय 25, रा. मंगळवार पेठ, सातारा) याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

दि. 21 मार्च 2022 रोजी ही संतापजनक घटना घडली होती. सोनगाव येथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली मुलगी दिसली. घटनेचे गांभीर्य ओळखून हे नागरिक सातारा तालुका पोलिस ठाण्यात गेले. मुलीला रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपास करून संकेत याला अटक केली. पो. नि. विश्वजित घोडके यांनी तपास करून तत्कालीन आयपीएस आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news