Satara Politics : ना. एकनाथ शिंदे यांची मंत्री शिवेंद्रराजेंनी घेतली भेट

सातारा नगरपरिषद व मेढा नगरपंचायतीमधील विकास कामांवर चर्चा
Satara Politics : ना. एकनाथ शिंदे यांची मंत्री शिवेंद्रराजेंनी घेतली भेट
Published on: 
Updated on: 

बामणोली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब ता. महाबळेश्वर या ठिकाणी दोन दिवस मुक्कामी दौऱ्यावर आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली. यावेळी सातारा नगरपरिषद व मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामे व शहराच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी महाबळेश्वर येथे दाखल झाले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ते त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब येथे पोहचले. यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची भेट घेवून विविध मुद्यावर संवाद साधला. सातारा नगरपालिकेच्या अनुषंगाने काय विकासकामे राबवता येतील, विविध प्रकल्पांना कशी गती देता येईल, या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली. तसेच मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे व मेढा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काय काय प्रकल्प राबविता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सातारा नगरपरिषद व मेढा नगरपंचायतमधील नगर विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांवर शिवेंद्रराजे यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध विकासात्मक विषयांवरही विचारविनिमय केला. याप्रसंगी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, नगरसेवक फिरोज पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.