Satara Crime : पुण्यातील एमपीआयडी गुन्ह्यातील संशयित जाळ्‍यात

म्हसवड पोलिसांच्या सतर्कतेमुळे या संशयित आरोपींना पकडण्यात यश
Satara Crime : पुण्यातील एमपीआयडी गुन्ह्यातील संशयित जाळ्‍यात
Published on: 
Updated on: 

म्हसवड : रात्रीच्या गस्तीवेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ते पुण्यातील एमपीआयडी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात पसार असल्याचे उघड झाले. म्हसवड पोलिसांच्या सतर्कतेमुळे या संशयित आरोपींना पकडण्यात यश आले.

अजित सागर कसबे (वय २७, मूळ रा. माळशिरस-मोहोळ परिसर, जि. सोलापूर; सध्या रा. चाकणनगर, धनकवडी, पुणे) आणि ओंकार महेश थोरात (२५, रा. साईभूमाळी हाईट्स सोसायटी, जांभूळवाडी, कात्रज, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. म्हसवड पोलिस ठाण्याचे पथक रात्री गस्त घालत असताना हे दोघे संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांचा पुणे शहरातील महाकाळनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्ह्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १२२ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पोमण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित शिंदे, पोलिस अंमलदार शहाजी वाघमारे, प्रकाश इंदुलकर, अनिल वाघमोडे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.