Satara news: मेढा–बामणोली मार्गावर दरडींचा वाढता धोका

मेढा–बामणोली या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला
Satara news: मेढा–बामणोली मार्गावर दरडींचा वाढता धोका
Published on
Updated on

सावली : मेढा–बामणोली या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरडी कोसळत असून दगड-माती थेट रस्त्यावर येत आहे. ठेकेदाराकडून दरडी हटवण्याचे काम सुरू असतानाही सतत पडणाऱ्या पावसामुळे नव्याने दरडी कोसळत असल्याने या मार्गावरील प्रवास अधिकच धोकादायक बनला आहे.

रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी डोंगर कापण्यात आले आहेत. मात्र, आवश्यक त्या संरक्षण भिंती, उतार स्थिरीकरण तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढताच दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मार्गाची पाहणी करून धोकादायक ठिकाणांवरील दरडी हटवाव्यात, आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभाराव्यात आणि रस्ता रुंदीकरणाची अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news