Satara Gelatin sticks seized: मायणीत जिलेटिनच्या १८०० कांड्या सापडल्या

सुमारे ८ हजार डिटोेनेटर्सही जप्त; परप्रांतीय संशयित ताब्यात
Satara Gelatin sticks seized: मायणीत जिलेटिनच्या १८०० कांड्या सापडल्या
Published on
Updated on

खटाव/वडूज : मायणी (ता. खटाव) येथील गरवारे वस्तीत स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि वडूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १८०० जिलेटिन कांड्या आणि सुमारे ८ हजार डिटोनेटर्ससह १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विशाल लक्ष्मण जाट, बारुलाल लक्ष्मण जाट (सध्या रा. मायणी, मूळ राजस्थान) आणि शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

एलसीबीचे हवालदार अजित करणे यांनी वडूज पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरी जबाबानुसार एलसीबीचे पो. नि. विश्वजित घोडके यांनी हवालदार कर्णे, पो.कॉ. प्रवीण पवार आणि स्वप्निल दौंड यांना मायणी शेजारील गरवारे वस्ती येथे विशाल जाट आणि बारुलाल जाट हे जिलेटिन या स्फोटक पदार्थाची बेकायदेशीर विक्री करत असल्याने घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकासह पोलिस उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, हवालदार चव्हाण, कॉ. काळेल, चव्हाण आणि सहकाऱ्यांनी मध्यरात्रीनंतर सव्वाबारा वाजता गरवारे वस्ती येथे धाड टाकली. घटनास्थळी पोलिसांना दोन चारचाकी गाड्या आणि शेजारी दोन व्यक्‍ती उभे असलेले आढळले. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी पंचासमक्ष दोन्ही वाहनांची झडती घेतली असता वाहनांमध्ये खाकी रंगाचे अनेक बॉक्स दिसून आले. त्यावर इंग्रजी भाषेत स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीचे नाव दिसल्याने सातारा नियंत्रण कक्षाला कळवले. बीडीडीएस आणि फॉरेन्सिक पथक तसेच श्वानाने वाहनांमध्ये स्फोटके असल्याची खात्री केल्यानंतर वाहने तसेच एक ४०७ वाहन, जिलेटिन कांड्या, डिटोनेटर्स, कार्टेक्स, सेफ्टी फ्यूज सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. या छाप्यात १८०० जिलेटिन कांड्या, ८ हजार डिटोनेटर्स आणि इतर साहित्य असा मिळून एकूण १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news