Satara Crime: सातवर्षीय चिमुरडीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकाला अटक

फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आसू) येथे सातवर्षीय चिमुरडीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली
Child abuse
Child abusePudhari
Published on
Updated on

फलटण : फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आसू) येथे सातवर्षीय चिमुरडीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी चिमुरडीचे आई-वडील शेतमजुरीसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात मुलगी आणि तिची आजी उपस्थित होती. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर चिमुरडी रडत तिच्याकडे आली. यावेळी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घरात बोलावून तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याची माहिती तिने आईला दिली.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी तत्काळ फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान चिमुरडीला घरात बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news