Satara Theft: मलकापुरात धाडसी घरफोडी

साडेसहा लाखांचे दागिने लंपास; सेफ्टी दरवाजाचा कडीकोयंडा तोडला
theft
theftPudhari
Published on
Updated on

कराड : मलकापूर (ता. कराड) येथील शोभना आर्केड इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुवर्णा विकास पवार (वय 40, रा. मलकापूर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा पवार या शनिवारी शेतीच्या कामानिमित्त हिंगनोळे येथील गावी गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाच्या कडी-कोयंड्याचे स्क्रू काढून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे नऊ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

दरम्यान, सोमवारी दुपारी इमारतीत राहणाऱ्या सविता शिंदे यांनी पवार यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. तसेच काही फ्लॅटला बाहेरून कड्या लावण्यात आल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पवार या घरी परतल्या असता त्यांना दरवाजा अर्धवट उघडा दिसला व घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. तपासणी केली असता कपाटातील दागिन्यांची पिशवी गायब असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news