Satara call center case: कॉल सेंटरप्रकरणी मुख्य संशयिताला अटक

डिजिटल अरेस्टसह ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यानंतर याची पुढील लिंक नाशिकपर्यंत असल्याचे समोर आले
Bogus Call Center
Fake Call Center pudhari News
Published on
Updated on

सातारा : पाच दिवसांपूर्वी कोरेगाव येथे कॉल सेंटर थाटून थेट अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टसह ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यानंतर याची पुढील लिंक नाशिकपर्यंत असल्याचे समोर आले. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) यातील मुख्य संशयित आरोपी बिपीन रामतीर्थ गुप्ता ऊर्फ बिपिन साहू (वय 35, सध्या रा. गोविंदनगर, नाशिक) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सातारा एलसीबीने सुरुवातीला सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी (वय 33, रा. मानखुर्द पश्चिम मुंबई) हा कॉल सेंटर मालक आहे. विरेंद्र विनोद बोडरे (वय 27 वर्षे, रा. गोवंडी, मुंबई), अक्षय रामचंद्र भंडारी (वय 28, रा. गोवंडी मुंबई), मनीष दिनेश जोशी (वय 28), रितेश चंद्रेश चौहान (वय 26, रा. नालासोपारा, मुंबई) यांना अटक केली आहे. या संशयितांकडून चौकशीत बिपीन साहू मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. सातारा एलसीबी पथकाने कोरेगावात बेकायदा कॉल सेंटरमधून फसवणूक होत असल्याचे समोर आणले. पोलिसांनी तेथे छापा टाकला. या ठिकाणाहून अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने फसवले जात असल्याचे समोर आले.

सातारा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तब्बल 36 लाखांची रोकड व इतर साहित्य जप्त केले. संशयितांची धरपकड करून 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी पाचजणांचा ठगवण्यासाठी सहभाग असल्याचे समोर आले आहे. या तपासादरम्यान नाशिकपर्यंत लिंक गेली. सातारा पोलिसांनी तिथे जाऊन बिपिन साहू याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून 3 मोबाईल जप्त केले आहेत. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली. एलसीबीचे पो.नि. विश्वजित घोडके पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news