Mahabaleshwar Tapola Road: महाबळेश्वर-तापोळा खचलेल्या रस्‍ते कामात अडथळा; दोन कि.मी. करावी लागतेय पायपीट

बुधवारीही वाहतूक ठप्‍प
Mahabaleshwar Tapola Road: महाबळेश्वर-तापोळा खचलेल्या रस्‍ते कामात अडथळा; दोन कि.मी. करावी लागतेय पायपीट
Published on
Updated on

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर शहरापासून तापोळ्याकडे जाणारा एकमेव रस्ता फळणेवस्ती नजीक खचल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तापोळा विभागाचा संपर्क तुटला आहे. सध्या या खचलेल्या रस्त्याबाजूला तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या सिमेंटच्या झाकणाच्या आधारे नागरिकांची ये-जा सुरू आहे. हा रस्‍ता खचल्‍याने तापोळ्याकडे जाणार्‍या मार्गावरील गावातील ग्रामस्‍थांना पायपीट करावी लागत आहे.

महाबळेश्वर पालिकेच्या वतीने भोईमिया बंगल्याची संरक्षक भिंत तोडून पर्यायी रस्त्याचे काम मंगळवारी सुरु करण्यात आले. या कामात चिखल मातीमुळे अडथळे येत होते तर तापोळा भागातून मेढा रस्त्यावर निघणाऱ्या वनविभागाची हेलन्स पॉईंट या फॉरेस्ट राईडवर काही मोरीचे काम करून हा रस्ता तात्पुरता वाहनांसाठी सुरु करण्याचे प्रयत्न सुरु करण्‍यात आले. पालिकेचे अपुरे मनुष्यबळ, साधनसाम्रगीच्या अभावामुळे जि.प. सदस्‍य अजित संकपाळ, संजयराव मोरे यांच्यासह सहकारी तापोळा भागातून साधनसामग्री घेऊन रस्ते काम पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

रस्‍ता खचल्‍यानंतर दुसर्‍या दिवशीही अनेकांनी आपली वाहने पलीकडे लावून कसेबसे चालत येत पायपीट करत ये -जा करावी लागली. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत पर्यायी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. तरीही बुधवारीही या रस्‍त्‍यावरील वाहतूक ठप्‍पच होती.

बुधवारी सायंकाळी मोठमोठे दगड टाकून रस्ता केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालिकेच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांसह जि.प. अजित संकपाळ, पं.स.सदस्‍य संजयराव मोरे, संजय शेलार, सुभाष कारंडे, गणेश उतेकर, विशाल संकपाळ, सचिन कदम यांच्‍यासह शिवसैनिकही कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news