Satara Land Fraud: जमीन परस्पर नावावर करून फसवणूक

महसूल अभिलेखांमध्ये फेरफार करून खोटी कागदपत्रे तयार करत जमीन परस्पर दुसऱ्याच्याच नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार
Land Scam
Land ScamPudhari
Published on
Updated on

लोणंद : खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील गट क्रमांक ६५ मधील ३२ गुंठे जमिनीच्या मालकी हक्काबाबत महसूल अभिलेखांमध्ये फेरफार करून खोटी कागदपत्रे तयार करत जमीन परस्पर दुसऱ्याच्याच नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला . याप्रकरणी तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात फसवणूकप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला.

याबाबत सलीम शेख (वय ५१, रा. नाळेमळा, जाधववाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चाँद महम्मद इनामदार (मुलाणी, रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे), तत्कालीन तलाठी आरती महादेव दळवी आणि तत्कालीन सर्कल अधिकारी रुपाली यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

तक्रारीनुसार, २००२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत संशयितांनी संगनमत करून पिंपरे बुद्रुक येथील गट क्रमांक ६५ मधील सलीम शेख यांच्‍या मालकीची ३२ गुंठे जमीन महसूल नोंदींमध्ये फेरफार करून मृत रहीमतबी इनामदार (मुलाणी) यांच्या नावावर नोंदवली. यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून सरकारी रेकॉर्डमध्‍ये बदल करण्यात आला. ही बाब समोर आल्‍यानंतर सलीम शेख यांनी न्‍यायालयात दाद मागितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news