Koyna Dam: कोयनेत ३.८१ टीएमसी पाण्याची आवक

धरणाच्या पाणी उंचीत ८ फूट ७ इंचाने वाढ होऊन धरणात सरासरी ४४,०९७ क्यूसेक पाण्याची आवक सुरू
Koyna Dam
Koyna DamPudhari
Published on
Updated on

पाटण : मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने शनिवारी सायंकाळी पाच ते रविवारी सायंकाळी पाचपर्यतच्या २४ तासांत कोयना धरणात ३.८१ टीएमसी पाण्याची आवक झाली. धरणाच्या पाणी उंचीत ८ फूट ७ इंचाने वाढ होऊन धरणात सरासरी ४४,०९७ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे.

रविवारी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा २२.९२ टीएमसीवर पोहोचला. त्यामुळे आता धरणातील उपयुक्त पाणीसाठा १७.८० टीएमसी इतका झाला आहे. रविवारी सायंकाळी पाचपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे १९७ मि.मी. पाऊस झाला असून १ जूनपासून ८६१ मि.मी. पाऊस झाला. नवजा येथे २०४ मि.मी. पाऊस झाला असून १ जूनपासून १ हजार १२८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news