Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के

रिश्टर स्केलवर २.१ ते २.५ तीव्रता; चार तासांत हादरे
Earthquake
Earthquake
Published on
Updated on

पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते मंगळवारी पहाटे चार या कालावधीत भूकंपाचे पाच सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता २.१ ते २.५ इतकी नोंदली गेली. धक्क्यांची तीव्रता कमी असल्याने ते नागरिकांना जाणवले नाहीत.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास २.१ तीव्रतेचा पहिला धक्का नोंदविण्यात आला. त्यानंतर दीड वाजता २.३ तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. सव्वातीन वाजता २.२, त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांनी २.५ आणि पहाटे चार वाजता २.१ तीव्रतेचा पाचवा धक्का नोंदविण्यात आला. या सर्व भूकंपांचे केंद्र सातार्‍यापासून सुमारे ५० ते ५२ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी रात्री बसलेल्या धक्क्यांमुळे कोयना धरण किंवा परिसरातील कोणत्याही बांधकामाला हानी झालेली नाही. पाटण तालुक्यातही कुठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात एकाच रात्री पाच धक्के बसल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

भूकंपप्रवण क्षेत्रात असंख्य धक्के

कोयना धरण परिसर भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत या भागात लहान-मोठ्या भूकंपांचे असंख्य धक्के नोंदविण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश धक्के सौम्य असल्याने नागरिकांना जाणवत नाहीत. साधारणतः, ३ रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचे धक्के जाणवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news