Satara News: कोरेगाव मतदारसंघात वगळले ४० हजार मतदार

प्रांताधिकारी, तहसिलदार : आक्षेप असणाऱ्यांची सुनावणी होणार
Voter
Voter Pudhari
Published on
Updated on

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विशेष पुनरिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्‍ये एकूण ४० हजार ७८८ जणांची नावे कमी झाली आहेत. ज्‍यांना मतदार यादीवर आक्षेप आहेत, अशा लोकांची सुनावणी घेवून दुरूस्‍ती केली जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार संगमेश कोडे यांनी दिली.

विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मतदारसंघात ३ लाख २८ हजार ५४ मतदारांची नोंद होती. या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारानुसार २ लाख ८४ हजार ८६६ इतकी नोंदणी झाली आहे. यामध्ये ४३ हजार १८८ मतदार अनकलेक्‍टेबल आहेत. त्यामध्ये १२ हजार ६०९ मयत, ३ हजार ६०८ दुबार, २२ हजार ५५४ स्थलांतरीत, ४ हजार ३१६ अबसेंट, १०१ इतर मतदार आहेत. ३ लाख २८ हजार ५४ मतदार पैकी २५ हजार ६९९ विसंगती व १५ हजार ८९ मॅपिंग न झालेले अशा एकूण ४० हजार ७८८ यांचा सुनावण्या व कागद पत्र तपासणी होणार आहे.

या यादीमध्ये नाव नसल्यास फॉर्म ६ भरून नव्याने मतदार नोंदणी करावी. नावाबाबत आक्षेप असल्यास फॉर्म ७ भरून आक्षेप नोंदवता येणार आहे तसेच नाव, लिंग, वय, पत्ता या बाबत दुरुस्ती असेल तर फॉर्म ८ भरणे आवश्यक आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट मतदारांच्या तपशिलात तफावत आढळल्यास तसेच मतदार २००२ च्या मतदार यादीशी ज्यांचे मॅपिंग झालेले नाही अशा मतदारांसाठी संबंधित यादी भागाचा सहायक मतदार नोंदणी अधिकाराच्या स्तरावर सुनावण्या घेण्यात येणार आहेत. सुनावणी नंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्या कडे दावे हरकती सादर करता येतील. दावे व हरकती वर दि. ३१ ऑगस्ट २९ ऑक्टोबर या कालावधीत कार्यवाही करता येणार असून अंतिम मतदार यादी दि ४ नोहेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news