Satara Politics | कोरेगाव तालुक्यात 71 गावांवर महिलाराज

आरक्षणाने गणिते बिघडली; ‘कही खुशी कही गम’चे चित्र
Satara Politics |
Satara Politics | कोरेगाव तालुक्यात 71 गावांवर महिलाराजFile Photo
Published on
Updated on

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात सरपंचपदाचे पुन्हा एकदा फेर आरक्षण काढण्यात आले. यामध्ये अनेक ठिकाणचे आरक्षण बदलल्यामुळे इच्छुकांची विकेट पडली आहे. या आरक्षणाने अनेकांचे आडाखे चुकले असून राजकीय गणिते बिघडली आहेत. काही जणांना लॉटरी लागल्याने तालुक्यात कही खुशी कही गमचे चित्र आहे. तालुक्यावर महिलाराज राहणार असून, तालुक्यात 71 महिला सरपंच होणार आहेत.

कोरेगाव तालुक्यातील 142 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आरक्षण सोडतीसाठी विविध गावचे ग्रामस्थ आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

कोरेगाव तालुक्यात अनुसूचित जाती महिलांसाठी 7, अनुसूचित जाती खुला 6, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांच्या मागासप्रवर्ग महिलांसाठी 19, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी 19 तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी 45 आणि सर्वसाधारण खुला 45 अशी आरक्षित पदे निश्चित करण्यात आली होती.

तालुक्यातील अनपटवाडी, अनभुलेवाडी, अरबवाडी, आझादपूर (न्हावी खुर्द), आसनगाव, कण्हेरखेड, करंजखोप, काळोशी, कोलवडी, खामकरवाडी, खेड (नांदगिरी), गुजरवाडी (पळशी), चवणेश्वर, चिमणगाव, जरेवाडी, जांब खुर्द, तांबी, तारगाव, त्रिपुटी, धुमाळवाडी (नांदगिरी), नांदवळ, पिंपोडे खुर्द, पिंपोडे बुद्रुक, पेठ किन्हई, फडतरवाडी, बनवडी, बर्गेवाडी, बोधेवाडी (भाडळे), बोबडेवाडी, भक्तवडी, भाकरवाडी, भाटमवाडी, भावेनगर, भिवडी, राऊतवाडी, रुई, ल्हासुर्णे, वाठार स्टेशन, विखळे, शिरंबे, शेंदुरजणे, शेल्टी, सायगाव (धामणेर), हासेवाडी आणि हिवरे ही गावे खुली झाली आहेत.

अंभेरी, अपशिंगे, आसगाव, कठापूर, कवडेवाडी, किन्हई, कुमठे, खडखडवाडी, खिरखिंडी, चंचळी, चांदवडी, चोरगेवाडी, चौधरवाडी, जगतापवाडी, तांदूळवाडी, दरे तर्फ तांब, दहिगाव, दुघी, दुधनवाडी, धामणेर, नलवडे वाडी (तारगाव), नायगाव, पवारवाडी, बिचुकले, बोधेवाडी (चिमणगाव), बोरीव, भंडारमाची, भाडळे, मध्वापुरवाडी, मुगाव, मोरबेंद, मोहितेवाडी, रामोशीवाडी, रिकीबदारवाडी, वाघजाईवाडी, तडवळे संमत वाघोली, वाठार (किरोली), वेळू, शिरढोण, साठेवाडी, सायगाव (एकंबे), सासुर्वे, सुर्ली, सुलतानवाडी, होलेवाडीत सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहेत.

अंबवडे संमत वाघोली, आसरे, किरोली, कोंबडवाडी, गुजरवाडी, (टकले), घाडगेवाडी, चिलेवाडी, जळगाव, टकले, नागझरी, नागेवाडी, निगडी, न्हाळेवाडी बेलेवाडी, बोरगाव, रणदुल्लाबाद, वाघोली, सोनके आणि सोळशीत ओबीसी आरक्षण पडले आहे. तर अंबवडे संमत कोरेगाव, एकसळ, जांब बुद्रुक, जायगाव, तळीये, देऊर, नलवडेवाडी (बिचुकले) न्हावी बुद्रुक, परतवडी, पळशी, पाडळी स्टेशन, भीमनगर, भोसे, मंगळापूर, रेवडी, वडाचीवाडी, सर्कलवाडी, साप आणि सिद्धार्थनगरमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news