Pudhari Edu Disha: ‘पुढारी एज्युदिशा‘मध्ये एकवटल्या ज्ञानवाटा

भविष्याचा वेध घेणारे प्रदर्शन बहरात : आज होणार समारोप
Pudhari Edu Disha
Pudhari Edu DishaPudhari
Published on
Updated on

सातारा : दै. ‌’पुढारी‌’ एज्यु-दिशा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक प्रदर्शन चांगलेच बहरात आले आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये या शैक्षणिक प्रदर्शनाचीच चर्चा सुरू आहे. विद्यार्थी व पालकही प्रदर्शनस्थळी आवर्जुन हजेरी लावत असून मार्गदर्शनपर व्याख्यानांचा लाभ घेत आहेत. शैक्षणिक स्टॉलला भेट देवून ते करिअरबाबतची उपयुक्त माहिती समजून घेत आहेत. या प्रदर्शनस्थळी अवघ्या ज्ञानवाटा एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै. ‌‘पुढारी‌’ एज्यु-दिशा प्रदर्शनामुळे गेले दोन दिवस पोलिस करमणूक केंद्र शिक्षणाचे जणूकाही माहेरघर झाले आहे. शुक्रवारी दिमाखदार सोहळ्यात जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाला प्रारंभ झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी तोबा गर्दी केली. गेले दोन दिवस विविध तज्ञांनी फार्मसी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व त्यामधील करिअरच्या संधी तसेच मेडिकल व इंजिनिअरींग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परिक्षांची तयारी व त्याविषयी मार्गदर्शन, करिअर गाईडन्स अशा विविध विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सकाळपासून पोलिस करमणूक केंद्रात गर्दी झाली होती.

मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्ते करत असल्याने विद्यार्थी एकाग्र होवून लक्ष देत होते. प्रत्येक वक्त्याच्या मार्गदर्शनाला गर्दी होत होती. विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेटी देवून विद्यार्थ्यांसह पालक संबंधित कॉलेजमधील विविध उपक्रम, शैक्षणिक फी आदींची माहिती घेत होते. आज पुढारी एज्यु दिशा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून तज्ञ वक्त्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

‌‘पुढारी‌’ने राबवलेल्या या उपक्रमाबाबत प्रत्येकजण भरभरुन बोलत होता. विद्यार्थी व पालकांना खऱ्या अर्थाने मोलाची माहिती, दिशा या प्रदर्शनातून मिळत असून संभ्रमावस्थेचे वातावरण दूर होत असल्याचे सांगताना अनेकांनी ‌‘पुढारी‌’ला पुन्हा पुन्हा धन्यवाद दिले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित एज्युदिशामध्ये इयत्ता १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

पात्रता : ७५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी.

काय करावे?: विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेज चे नाव आणि मार्कलिस्ट

९१७२८४०७३९ या व्हॉटस्‌‍ॲप क्रमांकावर पाठवावे.

अधिक माहितीसाठी : विद्यार्थी व पालकांनी ८८०५००७६७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रदर्शनातील आजचे व्याख्यान

रविवार दि. ७ जून रोजी ‘पुढारी एज्युदिशा’ प्रदर्शनात सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘इंजिनिअरिंगचे बदलते ट्रेंडस्‌ आणि करिअरच्या सुवर्णसंधी’ या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होणार आहे. एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन विभागाचे अधिष्ठाता प्रा. प्रफुल्ल हत्ते हे व्याख्यान देणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news