Satara Accident : खंडाळा तालुक्यात दोन अपघातांत दोघांचा मृत्यू

धनगरवाडी व केसुर्डी गावांच्या हद्दीत महामार्गावर घटना
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी व केसुर्डी गावांच्या हद्दीत महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत पादचारी व दुचाकीस्वार अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसुर्डी (ता. खंडाळा) गावाजवळील महामार्गावरील पुलावर टेम्पो (क्र. एमएच-50-एन-5544) चालक श्रीधर भरत पवार (रा. सिव्हिल कॉलनी, सातारा) यांचा टायर पंक्चर झाल्याने ते वाहन बाजूला उभे करुन टायर बदलत होते. त्याचवेळी पुणे बाजूकडून साताऱ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच-11-बीएन-6715) टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश अनिल पवार (वय 25, रा. पाडळी, ता. खंडाळा) हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. याप्रकरणी श्रीधर पवार यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या घटनेत, धनगरवाडी (ता. खंडाळा) येथे महामार्ग ओलांडत असताना प्रकाश भिमाजी माने (वय 57, सध्या रा. धनगरवाडी, मूळ रा. बोरी, ता. खंडाळा) यांना साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या कारने (क्र. एमएच-47-एयु-9698) जोरदार धडक दिली. या अपघातात माने यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिरवळ पोलीस व रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला. याप्रकरणी रामचंद्र मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक दिनाकर शेषा हनाबा (रा. करंजाई, पनवेल, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलिस अंमलदार संजय केंगले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news