

लोणंद - खंडाळा रस्त्यावरील म्हावशी गावचे हद्दीतील पुलावर अहिरे येथील क्यु बेल्ट कंपनीतुन पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्री 12 पासुन आता पर्यंत ठप्प झाली आहे .पवनचक्कीचे टेलर वारंवार बंद पडत असल्यामुळे सकाळी कंपनीत कामाला जाणाऱ्या त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. या रोडवर वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. या रस्त्याला जवळचा कोणताही पर्याय मार्ग नसल्याने लांबून वळसा घालून वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे .
एकामागे एक असे चार - पाच ट्रेलर होते, ते एकाच जागी उभे राहिले गेले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती सकाळपर्यंत ही वाहतूक बंद होती . या मार्गावर पवनचक्कीचे टेलर वारंवार बंद पडत असतात त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वारंवार कोंडी होत असते .
रात्रीपासून झालेली वाहतूक सकाळपर्यंत बंदच होती. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी त्याचबरोबर कंपनीत जाणाऱ्या कामगार, अधिकारी यांची मोठी अडचण झाली होती. म्हावशी गावाजवळून कोणताही दुसरा पर्याय मार्ग नसल्याने अनेक वाहनांना वळसा मारून खंडाळा व लोणंद या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वाहनांची वाहतुक करताना योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.