Satara Electricity Problem : खंडाळ्यात महावितरणचा लपंडाव; नागरिक, विद्यार्थी, नोकरदारांची गैरसोय 

आंधळ्या कारभाराविरोधात संताप
Satara Electricity Problem : खंडाळ्यात महावितरणचा लपंडाव; नागरिक, विद्यार्थी, नोकरदारांची गैरसोय 
Published on: 
Updated on: 

खंडाळा : खंडाळा शहरासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वीजेच्या लपंडावाने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या वेळेतच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळच्या वेळी विद्यार्थी शाळा-महाविद्यालयासाठी तयारी करत असतात, तर नोकरदार कामासाठी बाहेर पडण्याच्या घाईत असतात. अशा वेळी अचानक वीज गायब होत असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

शेतकऱ्यांचीही कोंडी होत असून सध्या शेतीतील पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत गरजेचे असताना वीजपुरवठा अनियमित होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वीज येण्याची वेळ निश्चित नसल्याने पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. वीजेवर अवलंबून असलेली दुकाने, झेरॉक्स सेंटर, फ्लोअर मिल, वेल्डिंग वर्कशॉप तसेच विविध लघुउद्योगांनाही वारंवार वीज खंडित होण्याचा फटका बसत आहे.

वीज नसल्याने कामकाज ठप्प होते आणि ग्राहकांना नाहक प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news